Friday, February 22, 2019

गोटय़ा

हा खेळ खेळण्याची एक मजा आहे. या खेळामुळे आपल्याला आपले लक्ष्य कसे निवडायचे ते कळते. गोटय़ा हा खेळ दोघांत किंवा अन्य बरोबर खेळता येतो. हा खेळ खेळण्यासाठी प्रथम एक रिंगण आखून घ्यायचे असते. त्यानंतर त्यात काचेच्या गोटय़ा टाकायच्या नंतर नेम धरून त्यावर निशाणा साधायचा असतो. जो जास्त गोटय़ा मारतो तो विजयी ठरवला जातो. या खेळाची निर्मिती ही मूळात मुलांनी एकाग्र व्हावे यासाठीच झालेली आहे. तेव्हा गोटय़ा हा साधा वाटणारा खेळ खूपच मजेदार आहे. बालमित्रांनो, तुम्ही खेळता की नाही, गोटय़ा? खेळत नसाल तर अवश्य खेळून पहा.

No comments:

Post a Comment