हा खेळ मूळचा भारतीयच आहे. भारतासहित चीन व
जपानमध्येही तो खेळला जातो. तो शंक्वाकार असून त्यात लोखंडाचं एक निमुळतं
टोक असतं, त्याला आरू असं म्हणतात. पूर्वी भोवरा लाकडाचा आणि मोठ्या
आकाराचा असायचा. आता तो प्लॅस्टिक किंवा फायबरचाही असतो.
प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवऱ्याचा
उल्लेख सापडतो. यूरोपात चौदाव्या शतकानंतर भोवऱ्याचा वापर आढळतो. जीन व
जपानमध्ये भोवरा फार पुरातन काळापासून लोकप्रिय आहे. भोवरा एका टोकाला गोलसर जाड आणि दुसऱ्या टोकाला निमुळता असतो.
निमुळत्या टोकात लोखंडाची तार बसवितात. तिला ‘आर’ आणि डोक्यावरील बोंडाला
‘मोगरी’ म्हणतात. निमुळत्या भागावरून गुंडाळलेली दोरी घसरू नये म्हणून
त्यावर काप किंवा खाचा असतात. मोगरीपासून कापापर्यंत भोवरे रंगवून आकर्षक
करतात. निमुळत्या बाजूकडून दोरी गुंडाळल्यानंतर दोरीचे एक टोक हातात पक्के
धरून झटका देऊन तो आरेवर पडेल अशा रीतीने दोरीला ओढ देत फेकला, म्हणजे
भोवरा फिरू लागतो. या दोरील ‘जाळी’ आणि भोवऱ्याच्या फिरण्याला ‘नाद’ असे
म्हणतात.
हा खेळ खेळण्याचे
काही नियम नाहीत, पण तो खेळायला तुम्हाला भरपूर सरावाची आवश्यकता असते.
तसंच हा खेळ काळजीपूर्वक खेळावा लागतो, कारण भोवरा फिरवताना हातातून सुटला
तर तो लागून दुखापत होण्याचीही शक्यता असते. भोवरा कितीही जण मिळून खेळू
शकतात. अगदी एकटयानेही तो खेळता येतो.
भोवरा खेळताना डाव्या हातात तो पकडून
त्यावर उजव्या हाताने भोव-याला घट्ट दोरा गुंडाळायचा. दोरा निमुळत्या
बाजूकडून गुंडाळत जायचं. दो-याचं एक टोक हलकेच भोव-याच्या डोक्यापर्यंत
खेचून त्यावर अंगठा ठेवून, भोवरा उजव्या हातात अलगद पकडायचा. उजवा हात
खांद्यापर्यंत वर नेऊन जोरात झटका देऊन भोवरा सोडायचा. भोवरा जमिनीवर पडून
टुणकन एखादी उडी मारून गरगर फिरतो. सुरुवातीला वेगाने फिरणारा भोवरा थोडा
वेळ फिरल्यानंतर मंदावतो. भोवरा खेळायला जास्त जागा लागत नाही. भोवरा
हातावर घेऊन खेळण्याचीही पद्धत आहे. त्यात इजा होण्याचीही शक्यता असते,
म्हणून आपल्याला जमेल तसा तो खेळावा. आपणच काढलेल्या वर्तुळात भोवरा
टाकायचा. अट अशी की, त्या वर्तुळाच्या आतच तो फिरायला हवा. तो वर्तुळाबाहेर
गेला की बाद झाला.
हा खेळ खेळण्याची आणखी एक पद्धत म्हणजे
भोवरा फिरवताना, ज्याचा सर्वप्रथम फिरेल तो जिंकला आणि ज्याचा नंतर फिरेल
तो हरला. हरलेल्या सवंगड्यानं आपला भोवरा एका गोल रिंगणात ठेवायचा. नंतर
दुस-या भोव-यानं त्याला आस देत तो ठरवलेल्या हद्दीपर्यंत घेऊन जायचा. (आस
म्हणजे भोवरा फिरवून तो हातात घ्यायचा, फिरत असतानाच तो खाली ठेवलेल्या
भोव-याला मारायचा) भोवरा हद्दीच्या रेषेच्या पलीकडे गेला तर आस देणारा
जिंकला, जर त्याला आस देता नाही आली तर ती संधी दुस-याला मिळते. या प्रकारे
भोवरा खेळायला तुम्ही कुशल भोवरेबाजच असावे लागता.
No comments:
Post a Comment