लपंडावाचे आधुनिक रूप
लपंडावाचे आधुनिक रूप: (डबा ऐसपैस). आजच्या औद्योगिक काळात मोठ्या वाड्यांची शहरातील संख्या बरीच कमी होत आहे. त्याऐवजी सामूहिक गृहवसाहती निर्माण होत आहेत. अशा ठिकाणची लहान मुलेमुली एकत्र योतात. एक कुणीतरी मुलगा इतरांच्या पाठीवर बोटांच्या स्पर्शाने संख्या काढतो. ही संख्या ज्याने ओळखली, तो सुटला. पण जाला ही संख्या ओळखता येत नाही तो राजा होतो. त्याच्यावर राज्य येते. लपण्याच्या जागांचा साधारण मध्यभागी एक पत्र्याचा डबा ठेवण्यात येतो. जाच्यावर राज्य आहे त्याने डब्याजवळ उभे राहायचे. लपलेला प्रत्येकजण जाच्यावर राज्य आहे त्याला चुकवून डब्याला पायाने उडवून देण्याचा प्रयत्न करतो. अशा एखाद्याने धावत येऊन डब्याला उडवून देऊन ओरडायचे ‘डबाऐसपैस ?’ मग मात्र प्रत्यकाने राजाला न दिसता डब्यापर्यंत येण्यास हरकत नसते. राजाने डब्याच्या जवळ उभे राहून एकेकाचे नाव घेऊन तो कुठे लपला आहे हे सांगावे. असे एखाद्याचे नाव सर्वप्रथम सांगितले गेले, तर पुढील डावात त्याच्यावर राज्य येते आणी खेळ पुन्हा सुरू होतो.
No comments:
Post a Comment