एका खेळाडूने डोळे बांधून इतरांना शिवण्याचा लपंडावासारखा खेळ. वि. का. राजवाडे यांच्या मते कौशाम्बी नगरीतील ‘अंधाकौशिंबी’ या प्राचीन खेळावरून हे नाव आले. हा खेळ घरात वा बाहेर, मर्यादित चौरस वा गोलाकार बागेत खेळतात. खेळाडूंची संख्या नियमित नसते. डोळे बांधलेल्या खेळाडूची दिशाभूल करण्यासाठी प्रथम त्यास गरागरा फिरवितात. नंतर त्याने इतरांपैकी कोणासही शिवणे, चाचपून ओळखणे किंवा आवाजावरून ओळखणे, असे या खेळाचे काही प्रकारभेद आहेत. यांपैकी कोणत्याही प्रकाराने शिवलेला वा ओळखलेला खेळाडू बाद होतो; त्याच्यावर राज्य येते व खेळ पुन्हा चालतो. ‘लंगडी (आंधळी) कोशिंबीर’ या प्रकारात आंधळ्याखेरीज बाकीचे लंगडीने वावरतात. भारताप्रमाणेच चीन, जपान, कोरिया तसेच पाश्चात्त्य देशांतही वेगवेगळ्या नामरूपांनी हा खेळ रूढ आहे. एक प्रासंगिक खेळ म्हणून प्रौढही तो खेळतात.
राज्य घेणा-याला काही दिसत नसल्यामुळे हा खेळ खेळताना जास्त पळापळ होत नाही. त्याला चकवण्यासाठी इतर खेळाडू टाळ्या वाजवल्या जातात, वेगवेगळे आवाज काढतात, तर कधी हाकाही मारतात. सगळ्यांचा एकत्र आवाज आल्यामुळे तो खेळाडू गोंधळतो. एखाद हुशार असलेला खेळाडू त्याच आधारे दुस-या खेळाडूला बाद करतो.
‘लंगडी आंधळी कोशिंबीर’ हा या खेळाचाच एक उपप्रकार. यात राज्य असलेला खेळाडू सोडून इतर सगळे लंगडी घालत पळतात. हा खेळ भारतातच नाही तर चीन, जपान, कोरियासारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो.
No comments:
Post a Comment